
सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असलेले खान सर यांची अडचण वाढलेली असून अतिशयोक्ती दावा केल्याप्रकरणी त्यांना पाच लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आलेला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांनी खान स्टडी ग्रुपला दिशाभूल करणारी जाहिरात आणि अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस साठी हा दंड ठोठावला आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य आयुक्त निधी खरे आणि अनुपम मिश्र यांनी यासंदर्भात आदेश दिलेले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक कोचिंग क्लासेस त्यांची जाहिरात करण्यासाठी अतिशयोक्ती पूर्ण असे दावे करतात तर अनेकदा खोटे दावे देखील करतात. पोस्टर आणि होर्डिंगवर यशस्वी उमेदवारांचे फोटो लावून ते आपलेच विद्यार्थी आहेत असे देखील दाखवतात अशाच प्रकरणात खान स्टडी ग्रुपला दंड ठोठावण्यात आलेला आहे.
यूपीएससी सिविल सर्विस परीक्षा 2022 मध्ये निवड झालेल्या 933 विद्यार्थ्यांपैकी 682 विद्यार्थी आपलेच आहेत असा दावा खान सरांनी केलेला होता असा त्यांच्यावर आरोप आहे .