अंत्यविधीसाठीचे पैसे खिशात आहेत अन.. , कोपरगावात टोकाचे पाऊल

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार कोपरगावमध्ये समोर आलेला आलेला असून अंत्यविधीसाठी लागणारे पैसे खिशात ठेवून एका विवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. भाऊबीजेच्या दिवशी कोपरगाव शहरातील मोहिनीराज नगर येथे हा प्रकार समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सागर प्रदीप रांगोळे ( वय 39 ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून भाऊबीजेच्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास छताच्या हुकाला दोर बांधून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये अशी त्यांनी चिठ्ठी लिहिलेली असून माझ्या अंत्यविधीसाठी लागणारे पैसे शर्टच्या खिशात ठेवलेले आहेत असे देखील चिठ्ठीत लिहलेले होते

सागर हे विवाहित असून त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. सर्व काही व्यवस्थित असताना त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापपर्यंत समोर आलेले नसून सागर यांच्या भावाने या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.


शेअर करा