दोन ‘ सरकारी बाबू ‘ आले एसीबीच्या जाळ्यात , दोषमुक्त करण्यासाठी..

शेअर करा

सरकार दरबारी लाचखोरी रोखण्यासाठी कितीही प्रयत्न केले जात असले तरी दुसरीकडे सरकारी बाबू मात्र लाचखोरीला सोकावलेले पाहायला मिळत आहेत. जळगावमध्ये असाच एक प्रकार समोर आलेला असून चौकशी मधून दोष मुक्त करण्यासाठी समितीचे प्रमुख असलेल्या सहाय्यक गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी या दोन जणांना पाच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे ( वय 54 ) आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे ( वय 53 ) अशी दोन्ही आरोपी व्यक्तींची नावे असून दोघेही शासकीय कर्मचारी आहेत. त्यांच्या त्यांच्या अधिकारात असणाऱ्या एका एका चौकशीचा अहवाल देऊन समोरील व्यक्तीला दोषमुक्त करण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदार व्यक्ती यांनी त्यानंतर आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला आणि त्यानंतर जळगाव पंचायत समितीच्या आवारात सापळा रचण्यात आलेला होता. दोन्ही आरोपींना यावेळी पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले असून जिल्हा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने केलेली आहे.


शेअर करा