…. चक्क पोटात निघाली सुसाईड नोट, आढळला ‘ धक्कादायक ‘ मजकूर : नाशिक कारागृहात कैद्याची आत्महत्या

  • by

कारागृहातील काही गैरप्रकार बाहेर येऊ नयेत यासाठी निवडक कैद्यांचे होणारे हाल काही नवीन नाहीत.अशाच जाचाला वैतागून नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . तपास करून देखील सुसाईड आढळली नाही मात्र कैद्याने सुसाईड नोट ही आपल्या मृत्यूनंतर गायब केली जाईल ह्या भीतीने चक्क प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून गिळून टाकली होती. Suicide note wrapped in plastic paper and swallowed by prisoner in Nashik.

कारागृह कर्मचाऱ्यांच्या वागणुकीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. कैद्याचे शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांना शरीरातून ही सुसाईड नोट आढळून आली. आत्महत्या केलेल्या कैद्याला स्वतंत्र तुरूंगात ठेवण्यात आले होते. कैद्यांसाठी मोबाइल फोनची व्यवस्था करण्यासारख्या बेकायदेशीर कामात कारागृहातीलच काही कर्मचारी सहभागी असल्याचा दावा यात करण्यात आलेला आहे. आत्महत्या केलेला कैदी अशी बेकायदेशीर कामे उघड करेल या भीतीने तुरूंगातील कर्मचार्‍यांनी त्याचा छळ करण्यास सुरवात केली होती.

सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या कागदावर म्हटले आहे की, “कारागृहातील कर्मचाऱ्यांचे हे बिंग फुटू नये या कारणास्तव त्याला सतत त्रास दिला जात होता आणि मला सांगितले की त्याच्यावर खोटा खटला दाखल होईल अशी धमकी दिली जात आहे.” इतर कैद्यांचा आरोप आहे की 32 वर्षांच्या या व्यक्तीला जाणीवपूर्वक स्वतंत्र तुरूंगात ठेवण्यात आले होते. या कैद्याच्या मृत्यूनंतर इतर 5 कैद्यांनी आणि नुकत्याच सुटका झालेल्या कैद्याने मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या इतर अधिकाऱ्यांनी पत्र लिहून भारतीय दंड संहिताच्या कलम 306 अंतर्गत तक्रार नोंदवावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे अतिरिक्त डीजीपी (जेल आणि सुधारात्मक सेवा) सुनील रामानंद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, “हे आरोप खरे आहेत की नाही हे ते चौकशीनंतर निर्णय घेतील”. दरम्यान, मृताच्या भाच्याने सांगितले की, गेल्या काही आठवड्यांत कैद्यानं मला मरायचे आहे, असे म्हटले होते.