काँग्रेसच्या जाहीरनाम्यात प्रत्येकासाठी ‘ काही ना काही ‘, काय आहे जाहीरनामा ?

शेअर करा

तीन डिसेंबर रोजी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार असून लोकसभेची सेमी फायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे . तेलंगाना राज्यात सध्या बीआरएसची सत्ता असून जर काँग्रेस सत्तेत आली तर महिलांना दरमहा २५०० रुपयांची मदत , प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत वीज मोफत आणि पाचशे रुपयात गॅस यासह इतर सहा प्रमुख आश्वासने काँग्रेसने दिलेली आहेत. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत या आश्वासनांची पूर्तता करण्यात येईल असे देखील सांगण्यात आलेले आहे. तेलंगाना विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हैदराबादमध्ये ‘ अभय हस्तम ‘ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये ही आश्वासने देण्यात आलेली आहेत.

काँग्रेसने म्हटले आहे की , ‘ जर निवडणुकीनंतर काँग्रेसला सत्ता मिळाली तर महिलांना २५०० रुपये दरमहा आणि पाचशे रुपयांत गॅस देण्यात येईल . प्रत्येक घरी 200 युनिट वीज मोफत देण्याचे वचन खर्गे यांनी दिलेले असून दरवर्षी शेतकऱ्यांना 15000 रुपयांची मदत , शेतमजुरांना 12000 रुपयांची देण्यात येईल सोबतच दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा देखील देण्यात येईल ,’ असे सांगण्यात आलेले आहे .


शेअर करा