बोल्हेगावच्या ‘ त्या ‘ घटनेतील चारही जण ताब्यात , तोफखाना पोलिसांची कारवाई

शेअर करा

नगर शहरात बोल्हेगाव परिसरात एका व्यक्तीवर खुनी हल्ला करणाऱ्या चारही आरोपींना ताब्यात घेण्यास तोफखाना पोलिसांना यश आलेले असून त्यापैकी तिघांवर याआधी देखील गुन्हे दाखल आहेत . नगर शहरातील बोल्हेगाव परिसरात एका हॉटेलवर हा प्रकार दिवाळीच्या दिवशी घडलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार , अमोल प्रदीप कदम ( वय 24 वर्ष राहणार महादेव मंदिराजवळ बोल्हेगाव ) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून करण उर्फ डोडो गौतम अवताडे ( वय वीस वर्ष), खंडू उर्फ सुरज अरविंद भिंगारदिवे ( वय वीस वर्ष) संतोष उर्फ दादा जगन पाटोळे व आशिष उर्फ पप्पू अंतवन पाटोळे ( वय 19 वर्ष ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दिवाळीच्या दिवशी सणानिमित्त फिर्यादी व्यक्ती हे त्यांच्या हॉटेलवर लक्ष्मीपूजन करण्यासाठी गेले होते त्यावेळी तिथे ते आणि त्यांचा भाऊ असताना रात्री पावणे अकराच्या सुमारास आरोपी तिथे आले आणि त्यांनी अमोल यांच्यासह इतर जणांना शिवीगाळ करत दमदाटी केली सोबतच मारहाण करत हॉटेलचे देखील नुकसान केले.

करण याने धारदार लोखंडी कोयत्याने अमोल यांच्यावर हल्ला केलेला होता त्यात ते जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांनी तोफखाना पोलिसांना जबाब दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे , जेसी मुजावर यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केलेली आहे. विक्रमी वेळेत आरोपींना गजाआड केल्यानंतर पोलिसांचे शहरात कौतुक केले जात आहे.


शेअर करा