‘ कापूसचोरी ‘ खून प्रकरणात कुटुंबीयांचा वेगळाच आरोप , खरा गुन्हेगार..

शेअर करा

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कडगाव इथे कापूस चोरी करताना चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी शोकाकुल कुटुंबाची भेट देखील घेतलेली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार , कापूस चोरी हा केवळ बहाना असून काही जणांनी आमच्या वडिलांचा खून केलेला आहे. पोलिसांनी घटनेमागील मुख्य सूत्रधार शोधावा ‘ अशी मागणी केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , कारभारी रामदास शिरसाट असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांची मुले असलेले अमोल शिरसाठ आणि अक्षय शिरसाठ यांनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे. 10 नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडलेली होती. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटकही केलेली आहे मात्र आपल्या वडिलांचा कापूस चोरीचा केवळ बहाना करून पद्धतशीरपणे आरोपींनी खून केलेला आहे ‘, असा आरोप मुलांनी केलेला आहे.

मुलांच्या म्हणण्यानुसार , ‘ हा खून पूर्वनियोजित असून या घटनेमागचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोधणे गरजेचे आहे. आमच्या वस्तीवर आत्तापर्यंत कधी कापसाची चोरी झालेली नाही त्यामुळे खून करणे हाच मुख्य उद्देश असल्याचा आमचा आरोप आहे. आरोपीने पोलिसांना चुकीचा जबाब दिलेला आहे त्यामुळे तपास थांबून खरा गुन्हेगार मोकळाच राहील असे म्हणत घटनेमागील सूत्रधाराला पोलिसांनी शोधून काढावे , ‘ असे त्यांनी आवाहन केलेले आहे.


शेअर करा