जामखेडमध्ये बेरोजगारीला कंटाळून तरुणाचे टोकाचे पाऊल , शिक्षण होऊनही ..

शेअर करा

नगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून जामखेड तालुक्यातील देवदैठण इथे एका 26 वर्षीय तरुणाने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे . 17 तारखेला शुक्रवारी ही घटना उघडकीला आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , तुकाराम पांडुरंग भोरे ( वय 26 वर्ष ) या युवकाने बेरोजगारीला कंटाळून गळफास घेतलेला असून डीएमएलटी हे शिक्षण त्याने घेतलेले होते. काही दिवस त्याने खाजगी लॅबमध्ये प्रॅक्टिस केली मात्र त्यानंतर शिकून देखील नोकरी मिळेना म्हणून तो नैराश्यात गेलेला होता.

शुक्रवारी सकाळी शेतात जात आहे असे सांगत तुकाराम भोरे हा घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर शेतातील एका लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेतला . परिसरातील एका शेतकऱ्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती पोलीस पाटील यांना देण्यात आली त्यानंतर अवघ्या काही मिनिटात पोलीस पथक देखील तिथे पोहोचले आणि पंचनामा करत त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.


शेअर करा