श्रीगोंद्यात भांडण मिटवणे अंगलट , आरोपीची बीआरएस नेत्याच्या घरी येऊन धमकी

शेअर करा

नगर जिल्ह्यात श्रीगोंद्यात एक पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा प्रकार बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांच्या मुलाला अंगलट आलेला असून घनश्याम शेलार यांच्या मुलाला घरी जाऊन शिवीगाळ करत दमदाटी करत धक्काबुक्की करण्यात आलेली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात त्यानंतर प्रवीण शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अनिल वसंत सोमवंशी ( राहणार शिरसगाव बोडखा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी सध्या अटक केलेली आहे. आरोपी याचे त्याच्या पत्नीसोबत घरगुती भांडण झालेले होते आणि त्यानंतर घनश्याम शेलार यांच्या मुलाने वाद नको म्हणून मध्यस्थी केली मात्र या गोष्टीचा राग येऊन आरोपी अनिल सोमवंशी याने 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शेलार यांच्या वडळी येथील घरी जाऊन फिर्यादी यांना दारू पिऊन शिवीगाळ केली होती.

आरोपी याने ‘ आमचे पती-पत्नीचे भांडण आहे आमच्या घरगुती वादातून हे कशाला पडता ? ‘ असे म्हणत तक्रारदार यांना शिवीगाळ केली आणि दमदाटी देखील केली. आरोपीने तलवारीचा देखील धाक दाखवला असून पुन्हा आमच्या भांडणात आलात तर तुम्हाला तलवारीने कापून टाकीन अशी देखील धमकी दिली असे फिर्यादींचे म्हणणे आहे .


शेअर करा