ट्रॅक्टरचे हफ्ते फेडू तरी कसे ? , हतबल शेतकऱ्याने त्यानंतर अखेर..

शेअर करा

कुणाचेही सरकार आले तरी शेतकरी बांधवांच्या अडचणी काही कमी होत नाहीत त्यातून अनेक आत्महत्या आतापर्यंत घडलेल्या असून पुन्हा एकदा असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात समोर आलेला आहे. सतत कर्जबाजारीपणा आणि नापिकी याला कंटाळून एका शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अंकुश हिम्मत चव्हाण ( वय 35 वर्ष ) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून अंकुश यांच्या वडिलांच्या नावाने तीन एकर खडकाळ जमीन आहे . वडिलांनी त्याला ट्रॅक्टर देखील घेऊन दिलेला होता . अंकुश याने शेतीसाठी दुकानदारांकडून बी बियाणे खरेदी केले मात्र तब्बल दोन महिने पाऊस आला नाही आणि खरिपात लावलेली मका पावसाअभावी पूर्णपणे वाळून गेली.

शेतीसाठी घेतलेले कर्ज ट्रॅक्टरचे हप्ते कसे फेडावेत या चिंतेत अंकुश गेल्या एक महिन्यांपासून नैराश्यात गेलेले होते. सोमवारी पहाटे गट क्रमांक 155 येथील एका झाडाला गळफास घेऊन त्यांनी आयुष्याचा शेवट केला . देवगाव रंगारी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून केलेला असून पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा