नाशिकच्या ‘ लेडी डॉन ‘ वर मोठी कारवाई , पोलीस आयुक्तांनी काढले आदेश

शेअर करा

महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून नाशिक इथे मारहाण करून दहशत निर्माण करणे , विनयभंग केल्याची खोटी बतावणी करून खंडणी मागणे आणि फसवणूक करणे अशा प्रकरणात एका महिलेला तडीपार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेले आहेत .

उपलब्ध माहितीनुसार , भारती साहेबराव अहिरे ( वय 45 ) असे महिलेचे नाव असून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिच्या विरोधात असंख्य गुन्हे दाखल आहेत. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारती हिने आपली दहशत निर्माण केलेली असून सर्वसामान्य नागरिकांना फसवणे . साथीदारांच्या मदतीने क्रूर वागणूक देणे अशा स्वरूपाचे गुन्हे तिच्यावर दाखल आहेत.

भारती हिच्यावर दमदाटी करणे , अनधिकृतपणे घरात घुसून शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करणे , अब्रू नुकसानीची धमकी देऊन खंडणी मागणे , जिवे मारण्याची धमकी देणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याकारणाने ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी केलेली आहे.


शेअर करा