दिवाळीत अनोखी भाऊबीज , बहिणीची एक्सिट मात्र चटका लावून गेली

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका बहिण भावाची जोरदार चर्चा असून बहिणीने भावासाठी स्वतःचे यकृत दान केले त्यामुळे पोटाच्या त्रासाने विकार आणि त्रस्त असलेल्या भावाला जीवदान मिळाले मात्र यकृत प्रत्यारोपण केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात बहिणीचा मृत्यू झालेला आहे. मुंबईत उपचार घेत असताना बहिणीने अखेरचा श्वास घेतला.

उपलब्ध माहितीनुसार , बुलढाणा जिल्ह्यातील अंधेरा येथील रमेश नागरे ( वय 48 ) यांचा शेतीसोबत हॉटेलचा व्यवसाय आहे . 2019 पासून पोटाच्या आजाराने ते त्रस्त झालेले होते . रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी यकृतामध्ये अडचण असल्याचे सांगितले आणि यकृताचा काही भाग प्रत्यारोपण करण्याची गरज व्यक्त केली.

त्यांना आवश्यक असलेले यकृत घटक नक्की कोण देणार याविषयी कुटुंबात चर्चा झाली. अनेक जणांचे रक्तगट तपासण्यात आले आणि अखेर त्यांची बहीण दुर्गा धायतडक यांचा रक्तगट आणि इतर सर्व तांत्रिक बाबी जुळून आल्यानंतर त्यांनी देखील मोठे मन दाखवत भावासाठी हा त्याग करण्याची तयारी दर्शवली त्यानंतर त्यांनी यकृत दान केले. त्यांचा हा त्याग भावाला जीवदान भावाला जीवदान देऊन गेला मात्र त्यांचा स्वतःचा यात मृत्यू झालेला आहे.


शेअर करा