महाराष्ट्रात ‘ स्पेशल २६ ‘, लाचलुचपतचे अधिकारी सांगत चार जण घुसले

शेअर करा

महाराष्ट्रात गुन्हेगारी टोळकी कुठल्या थराला जातील याचा काही भरवसा राहिलेला नाही. आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस आहोत असा बहाणा करत नवी मुंबईतील नेरूळ इथे एका लॉजिंग बोर्डिंगवर छापा मारून बार चालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत करणाऱ्या सहा जणांच्या टोळक्याला नेरूळ पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात दोन कथित पत्रकारांचा देखील समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार , संजय शंकर निराळे ( वय 47 वर्ष ), सागर संजय नलावडे ( वय 32 वर्ष ), ज्योती प्रमोद पांचाळ ( वय 34 ) हर्षला जोसेफ जॉन ( वय 34 ) दिव्या बाबुराज नायर ( वय 30 ) आणि वैशाली संदीप पाटील ( वय तेहतीस ) अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी हे मानखुर्द परिसरातील रहिवासी आहे.

नेरूळ परिसरातील राजमहाल सर्विस या बारमालकाकडून खंडणी उकळण्याच्या बहाण्याने गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास या टोळक्याने तिथे छापा मारला त्यावेळी आरोपींपैकी संजय निराळे याने आपण ‘ हर समय आपके साथ ‘ या वृत्तपत्राचा पत्रकार असल्याचे सांगितले त्यानंतर ज्योती प्रमोद पांचाळ हिनेदेखील आपण पत्रकार असल्याचे सांगितले होते.

इतर आरोपी सागर नलावडे , हर्षला जॉन , दिव्या नायर आणि वैशाली पाटील यांच्या गळ्यामध्ये नॅशनल अँटीकरप्शन अंड क्राईम कंट्रोल ब्युरो असे ओळखपत्र देखील आढळून आले. आतमध्ये शिरल्यानंतर महिला वेटरसोबत धक्काबुक्की केली आणि बारचालकासोबत त्यानंतर वाटाघाटी करण्यास सुरुवात केली होती

बारमालक प्रवीण प्रदीप शेट्टी यांनी त्यानंतर छाप्यासंदर्भात चौकशी केली त्यावेळी अँटी करप्शन कडून अशा पद्धतीचा छापा मारला जात नाही असे सांगण्यात आले त्यानंतर शेट्टी यांनी नेरूळ पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली आणि अवघ्या काही मिनिटात खरेखुरे पोलीस तिथे पोहोचले आणि सर्व सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. सीआरपीसी कलम 41 प्रमाणे त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलेले आहे.


शेअर करा