श्रीगोंदा तालुक्यात ‘ दृश्यम ‘ स्टाईल खून प्रकरण , फिर्यादीच निघाला आरोपी

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण श्रीगोंदा तालुक्यात समोर आलेले असून आपल्या नवऱ्याला प्रेमसंबंधाबद्दल विचारणा केली म्हणून संतप्त झालेल्या नवऱ्याने पत्नीचा खून केलेला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील ही घटना असून आरोपीने चक्क एक खड्डा खालून त्यात पत्नीचा मृतदेह पुरून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार , रूपाली ज्ञानदेव आमटे ( वय 24 वर्ष ) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिलेच्या भावाने पती ज्ञानदेव पोपट आमटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची समजताच आरोपी मोबाईल बंद करून फरार झालेला असून त्याच्या तपासार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिलेली आहे .

आरोपी ज्ञानदेव याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याच्या पत्नीला मिळालेली होती त्यावरून पत्नीने विचारणा केली म्हणून आरोपीने त्याचा राग मनात धरत 10 नोव्हेंबर रोजी घराच्या शेजारी मोठा खड्डा करून त्यानंतर पत्नीचा खून केला आणि या खड्ड्यांमध्ये तिचा मृतदेह पुरून टाकला. आरोपीने त्यानंतर आपण पत्नीला श्रीगोंदा इथे ब्युटी पार्लरमध्ये नेऊन सोडले मात्र ती परत आली नाही असा बहाणा करत माहेरच्या व्यक्तींची दिशाभूल केली आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यात देखील ती हरवल्याची तक्रार दिलेली होती .

पोलीस त्याच्या पत्नीचा शोध घेत होते मात्र त्याची पत्नी कुठेही मिळून आली नाही म्हणून चौकशीच्या दरम्यान महिलेच्या भावाने पतीवर संशय व्यक्त केला होता. आरोपी आणि त्याची पत्नी दोघेही श्रीगोंदा इथे गेले नसल्याची देखील माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेतली . आरोपीच्या घराजवळ नुकताच करण्यात आलेला खड्डा उकरण्यास सुरुवात केली त्यावेळी तिथे वास येऊ लागला आणि अखेर मयत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे .


शेअर करा