‘ अलीगंज पोलीस ठाण्यात या ‘ , अचानक फोन आल्याने घाबरला अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक अद्भुत असा प्रकार आणि चित्रपटाला लाजवेल अशी घटना नवी मुंबईत समोर आलेली असून आम्ही कस्टम आणि सीबीआयचे अधिकारी आहोत असे सांगत एका सायबर टोळीने कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीवर मनी लॉन्ड्रीग ची केस दाखल आहे आणि त्यात तुम्हाला अटक केली जाईल आणि सर्व मालमत्ता जप्त होईल असे सांगत तब्बल 23 लाख 25 हजार रुपये उकळलेले आहेत. सायबर पोलिसांनी एका टोळीच्या विरोधात फसवणूक आणि आयटीआय नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सुमित असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचे वय 34 वर्ष आहे . 12 ऑक्टोबर रोजी एका सायबर भामट्याने आपण कस्टमचे अधिकारी आहोत असे भासवत त्यांच्यासोबत संपर्क साधला आणि कॅनडा येथे जाणाऱ्या एका पार्सल मध्ये 50 पासपोर्ट आणि काही क्रेडिट कार्ड आहेत त्यामुळे या प्रकरणात तुमच्या नावाने अटक वॉरंट निघू शकेल अशी भीती त्यांना दाखवली. दोन वाजेपर्यंत अलीगंज पोलीस ठाण्यात या असे देखील त्यांना सांगण्यात आले. सायबर भामट्याने त्यावेळी स्कायपेवर त्यांना अरेस्ट वॉरंट देखील पाठवून दिले.

सदर प्रकारानंतर फिर्यादी घाबरून गेले आणि त्यानंतर सुमित यांनी लखनऊ इथे आपण येऊ शकत नाही असे सांगितले मात्र आरोपींनी त्यानंतर तुमची सगळी मालमत्ता जप्त करून नोटरी हाऊसमध्ये जमा करावी लागेल म्हणून मालमत्ता जप्तीचे देखील एक बनावट वॉरंट पाठवून दिले. सीबीआय अधिकारी आपण आहोत असे भासवत अनिल यादव नावाच्या व्यक्तीने सुमित यांना फोन करून वेळोवेळी पैशासाठी धमकावले त्यानंतर सायबर भामट्यांनी 3 कोटी 84 लाख रुपयांची मनी लॉन्ड्री केस तुमच्यावर आहे त्यासाठी रकमेच्या 2% नोटरी हाऊस मध्ये भरावी लागेल असे सांगण्यात आले .

सुमित यांनी त्यांच्या नावावरील सर्व शेअर्स विकले , बँकेमध्ये जमा असलेली रक्कम , पीएफ मधील रक्कम तसेच मित्रांकडून उसने घेऊन एकूण 23 लाख 25 हजार रुपये सायबर भामट्यानी सांगितलेल्या बँक खात्यावर पाठवून दिले त्यानंतर सायबर भामट्यांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात झाली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली .


शेअर करा