शेवगावात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार , तारीख वेळ घ्या जाणून

शेअर करा

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची नगर जिल्ह्यात गुरुवारी 23 तारखेला शेवगाव येथील साई लॉनवर सभा होणार असून सभेची जय्यत तयारी सकल मराठा समाजाने सुरू केलेली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी समाजामध्ये जनजागृती सुरू केलेली आहे. राज्यभर त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सध्या सुरुवात करण्यात आलेली असून विविध ठिकाणी त्यांच्या सध्या सभा सुरू आहेत.

मनोज जरांगे पाटील हे शेवगाव शहरात प्रथमच येणार असून ही सभा नियोजन पूर्ण व्हावी यासाठी संपूर्ण मराठा समाज सभेच्या नियोजनात व्यस्त आहे . 23 तारखेला गुरुवारी नेवासा इथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाल्यानंतर शेवगाव इथे दुपारच्या सुमारास सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व मराठा समाज बांधवांनी सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे


शेअर करा