नगर जिल्ह्यात अकोले इथे एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून सुपर मार्केटमध्ये काम करणारी अल्पवयीन मुलगी कामावरून सुटल्यानंतर घरी गेली नाही म्हणून तिच्या दाजींनी याप्रकरणी अकोले तालुका पोलिसात फिर्याद दिलेली आहे. अल्पवयीन मुलीचे वय सतरा वर्ष 11 महिने आणि 19 दिवस असल्याची माहिती आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी अल्पवयीन मुलीचे दाजी हे माळेझाप इथे नोकरी करत असून त्यांची अल्पवयीन मुलगी ही अकोले शहरातील एका सुपर मार्केटमध्ये काम करत होती. 13 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे ती कामावर गेली मात्र त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता घरी आली नाही.
अल्पवयीन मुलीचे दाजी यांनी त्यानंतर त्या सुपर मार्केटमध्ये भेट दिली त्यावेळी ती कामावर आलेली नसल्याची माहिती मिळाली. मुलीच्या दाजींनी तिच्या मैत्रिणींकडे तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. आपल्या मेहुणीला कुणीतरी अज्ञात कारणाने पळून नेलेले आहे असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून तपासाला सुरुवात केलेली आहे .