नगर एमआयडीसीजवळ अडवून लुटलं , फिर्यादी म्हणतात की..

शेअर करा

नगरमध्ये एक खळबळजनक असा प्रकार एमआयडीसी परिसरात समोर आलेला असून एमआयडीसीजवळ स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेजवळ एका व्यक्तीला मारहाण करून लुटण्यात आलेले आहे. 16 नोव्हेंबर रोजीची ही घटना असून चोरट्याने तीन लाख रुपयांची रोकड , बँकेचे पासबुक , क्रेडिट कार्ड आणि आधार कार्ड देखील चोरून नेलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , आशिष जयप्रकाश पांडे असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 394 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फिर्यादी यांच्या म्हणण्याप्रमाणे , एमआयडीसीतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेजवळून जात असताना नंबर नसलेल्या मोटरसायकलवर दोन जण आले आणि त्यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादीस मारहाण करत त्यांच्याकडील तीन लाख रुपयांची रोकड घेऊन तिथून पलायन केले . एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे .


शेअर करा