54% पेक्षा जास्त ओबीसी समाजासाठी.. , छगन भुजबळ म्हणाले की..

शेअर करा

राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी , ‘ देशात 54% पेक्षा अधिक असलेल्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी मी 35 वर्षे लढत आलेलो आहे आणि यापुढील काळात देखील लढत राहणार आहे. ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प राहणार नाही ‘, असे म्हटलेले आहे.

छगन भुजबळ हे इगतपुरी तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी ते म्हणाले की , ‘ मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी भूमिका आहे मात्र त्यांना वेगळे आरक्षण द्यायला हवे ही माझी भूमिका आहे. ओबीसी समाजाला सहजासहजी आरक्षण मिळाले नाही. आज ओबीसी समाजात 375 जाती आहेत अशातच ओबीसी मध्ये समावेश होण्यासाठी काही लोक अडून बसलेले आहेत ‘.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की , ‘ जाळपोळ झाली तर आम्ही शांत कसे बसणार. आंदोलन स्थळी पोलिसांवर दगडफेक झाली . महिला पोलिसांना देखील मारहाण झाली. पोलिसांना मारले म्हणून त्यांनी काठ्या चालवल्या या प्रकारात ७० पोलीस देखील जखमी झाले होते. मग काय मागायचे ते तुम्ही शांततेने मागायला हवे तुम्ही तुमच्यासाठी पुढे आला मग मी ओबीसीसाठी पुढे येऊ नको का ? ‘ असे देखील ते म्हणाले.


शेअर करा