पुणेकर बायकोने फॅशनेबल बांगड्या घातल्या म्हणून.., तिघांवर गुन्हा दाखल

शेअर करा

महाराष्ट्रात कौटुंबिक छळाचे एक अजब प्रकरण सध्या समोर आलेले असून फॅशनेबल बांगड्या घातल्या म्हणून एका विवाहित महिलेला तिच्या पतीने आणि सासूने तसेच एका महिला नातेवाईकाने बेदम मारहाण केलेली आहे. नवी मुंबई परिसरातील दिघा येथील ही घटना असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी विवाहित महिलेच्या तक्रारीवरून पती सासू आणि एका महिला नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार , प्रदीप आरकडे ( वय 30 ) हा त्याची पत्नी आणि आई यांच्यासोबत दिघा येथे राहायला असून 13 नोव्हेंबर रोजी पीडित विवाहित महिलेने फॅशनेबल बांगड्या घातलेल्या होत्या आणि विवाहित महिलेचा पती हा फॅशनेबल बांगड्या घालण्याच्या विरोधात होता त्यामुळे त्याने पत्नीसोबत वाद सुरू केला.

विवाहित महिलेच्या पन्नास वर्षीय सासुने तिचे केस ओढून तिला मारहाण केली त्यावेळी विवाहितेच्या पतीने तिला बेल्टने मारहाण केली. एक महिला नातेवाईक असलेली आरोपी हिनेदेखील पीडित महिलेला मारहाण करण्यापूर्वी जमिनीवर ढकलून दिले त्यानंतर ही तरुणी पुण्यातील तिचे माहेर असलेल्या ठिकाणी निघून गेली. तिथे गेल्यानंतर तिने पती सासू आणि एक महिला नातेवाईक यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 323 , 324 , 504 , 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर प्रकरण नवी मुंबई हद्दीत घडलेले असल्याकारणाने रबाळे एमआयडीसी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.


शेअर करा