छगन भुजबळ यांनी फर्नांडिस यांची जागा हडपली , अंजली दमानिया म्हणाल्या की..

शेअर करा

काही दिवसांपूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांनी ‘ मी माझ्या कष्टाचे खातो ‘ असे म्हटलेले होते त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री छगन भुजबळ यांनी सांताक्रुज येथील डोरीन फर्नांडिस यांची जागा हडपली असून त्यावर स्वतःचा बंगला बांधलेला आहे असा आरोप केलेला आहे.

अंजली दमानिया यांना पत्रकार परिषद घेण्यास देखील मनाई करण्यात आली होती म्हणून अखेर त्यांनी स्वतःच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत हे आरोप केलेले आहेत . विशेष म्हणजे अंजली दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबीय यांना देखील या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणलेले होते. समीर भुजबळ हे फर्नांडिस कुटुंबीयांना जागेच्या बदल्यात साडेआठ कोटी रुपये देणार होते मात्र ती रक्कम भुजबळ यांनी अद्यापही दिलेली नाही असे देखील अंजली दमानिया म्हणाल्या आहेत .

अंजली दमानिया यांनी यावेळी बोलताना , ‘ राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत देखील चर्चा केली. सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप ग्रुप बनवून समीर भुजबळ आणि फर्नांडिस कुटुंबियांमध्ये समन्वय साधण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्यात आला मात्र अद्यापही त्यांच्या मुलांना हक्काच्या जागेसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत , ‘ असे दमानिया यावेळी म्हणाल्या.


शेअर करा