मनोज जरांगे पाटील उद्या संगमनेरमध्ये , काय बोलणार याची मोठी चर्चा

शेअर करा

मराठा आरक्षणासाठी राज्यभर साखळी उपोषणाचा इशारा पुन्हा एकदा देण्यात आलेला असून एक डिसेंबरपासून राज्यभरात साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहेत . मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले असून 22 नोव्हेंबर रोजी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे दुपारी तीन वाजता शहरातील जाणता राजा मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौऱ्याला पुन्हा एकदा सुरुवात केलेली असून बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला येथून ते संगमनेर शहरात येणार आहेत . सकल मराठा समाजाकडून त्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी सुरुवात करण्यात आलेली असून जाणता राजा मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी स्टेजची उभारणी करण्यात आलेली असून मराठा बांधवांच्या वाहनासाठी पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे . मनोज जरांगे पाटील यांची सभा यशस्वी करण्यासाठी राज्यभरात मराठा बांधवांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून संगमनेर शहर आणि तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.


शेअर करा