महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूरमध्ये समोर आलेली असून नवरात्र उत्सवात दांडिया फेस्टिवलसाठी एका अभिनेत्रीला बोलावून तिच्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक पुत्र असलेल्या एका व्यक्तीच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. शुक्रवारी पोलिसांनी कमर तलाव येथून त्याला ताब्यात घेतलेले आहे. ‘ पुन्हा असे कृत्य करणार नाही ‘ अशी नोटीस बजावून त्याला तात्पुरते सोडून देण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , 22 ते 26 ऑक्टोबर दरम्यान सोलापुरातील नवरात्र उत्सवामध्ये अभिनेत्री असलेली सानिका भोईटे हिला बोलवण्यात आलेले होते . या कार्यक्रमात चेतन गायकवाड ( वय 28 ), प्रथमेश उर्फ सोनू प्रशांत खरात ( वय 22 ) आणि तुषार सुबोध गायकवाड ( वय 21 ), नागेश यशवंत येलगिरी ( वय 19 सर्वजण राहणार सोलापूर ) यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने अश्लील शब्द उच्चारून आपल्याला अपमानित केले आणि सोशल मीडियात देखील अभिनेत्रीबद्दल अश्लील पोस्ट केली अशी फिर्याद 26 ऑक्टोबर रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली होती.
सानिका भोईटे हिने त्यानंतर महिला आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांना या संदर्भात पत्र प्राप्त झाले होते. पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर सदर बाजार पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून सतत गुंगारा देणाऱ्या चैतन्य गायकवाड याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर नोटीस बजावून सोडून देण्यात आले.