जळगाव हादरले .. एकाच कुटुंबातील अल्पवयीन बहीण भावासह 4 जणांचा कुऱ्हाडीने वार करून खून

  • by

एका शेतातील रखवालदाराच्या चार मुलांची कुर्‍हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना बोरखेडा (ता.रावेर) रोडवर आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली. या हत्याकांडाने रावेर हादरले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत . Four people, including a minor sister and brother from the same family, were stabbed to death in Jalgaon raver

सविता मेहताब भिलाला (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व राणी (वय ५) अशी हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत. शेतातील रखवालदार पती पत्नी गावाला गेले असताना ही घटना घडली. रावेर शहरापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या बोरखेडा रोडवरील मुस्तफा यांच्या केळीबागेच्या शेतातील रखवालदार महेताब गुलाब भिलाला हा पत्नी व मोठ्या मुलासह मुळगावी गढी (ता. बिस्टान जि. खरगोन) येथील चुलतभावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी गेला होता. त्यानंतर ही घटना घडली.

आज सकाळी शेत मालक मुस्‍तफा हे शेतावर गेले असता घराजवळ कुणीच दिसलं नाही. त्यांनी मुलांना आवाज दिला, पण कुणीही प्रतिसाद देत नव्हतं. त्यामुळे त्यांनी घरात डोकावून पाहिले असता चौघांचे मृतदेह आढळून आले. चौघांचे मृतदेह पाहून मुस्तुफा यांना मोठा धक्का बसला. तातडीने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.