गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या, प्रियकराला पाठवलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हणाली की ..

  • by

तिला त्याच्यासोबत लग्न करायचे होते मात्र त्याच्याकडून सातत्याने टाळाटाळ सुरु होती . तरुणाने प्रेमात धोका दिल्यामुळे चाकण परिसरात एका तरुणीने गळफास घेऊन एक महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. तब्बल एक महिन्याने मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

आत्महत्येपूर्वी तरुणीने प्रियकराला एक मॅसेज केला असून त्यात “माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलंस, मी आत्महत्या करत आहे”, असं म्हटलं आहे. या प्रकरणी तरुणावर आत्महत्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण येथील २८ वर्षीय मुलीनं गेल्या महिन्यात प्रियकराचं नाव लिहून आत्महत्या केली होती.

चाकण परिसरात 22 सप्टेंबर रोजी एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलगी एका खासगी कंपनीत काम करत होती. तिचे लग्न झालेले असून तिने पाच वर्षे संसार करून पती सोबत पटत नसल्याने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ती आई वडील यांच्या सोबत न राहात स्वतंत्र राहायची. खासगी कंपनीत काम करून ती स्वतः चा उदरनिर्वाह भागवत होती. त्यादरम्यान सदर तरुणाचे आणि तिचे प्रेमसंबंध सुरु झाले होते मात्र त्याने लग्नास टाळाटाळ केल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गेल्या महिन्यात मुलीने आपल्या प्रियकराच्या मोबाईलवर “मी आत्महत्या करत आहे. माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलंस, your time is over now…I am doing suicide by by…! असा टेक्स्ट मॅसेज करून आत्महत्येच टोकाचं पाऊल उचलले. या घटने प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश धस हे अधिक तपास करत आहेत.