ज्यांना आरक्षण समजलं ते एका रात्रीत.., मनोज जरांगे पाटलांचा नेवाश्यात झंझावात

शेअर करा

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा इथे मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी दुपारी सभा झालेली होती त्यावेळी त्यांनी एक डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन केलेले आहे . आरक्षण मिळाल्यानंतर पुन्हा एकदा भेंडा इथे भेट देईल असे देखील ते म्हणाले असून मनोज जरांगे पाटील यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आणि सभेसाठी देखील प्रचंड गर्दी उपस्थित होती.

मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा बांधवांच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी रांगोळी काढण्यात आली होती आणि दहा जेसीबी मधून जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर जरांगे पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली होती.

जरांगे पाटील समाजाला म्हणाले की , ‘ तुम्हाला आरक्षण समजले नाही . ज्यांना समजले ते एका रात्रीत आरक्षणात गेले त्यामुळे सावध व्हा. हाती आलेल्या संधीचे सोने करा . एक डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा ‘, असे देखील जरांगे पाटील यांनी आवाहन केलेले आहे. सभा संपल्यानंतर आयोजकांनी वाहतूक थांबवत दोन्ही बाजूचा रस्ता देखील स्वच्छ केलेला असल्याचे यावेळी दिसून आले.


शेअर करा