अतिक्रमण काढायला अधिकारी गेला अन ‘ ॲट्रॉसिटी ‘ घेऊन आला , तोतया पोलीस अन..

शेअर करा

अतिक्रमण विरोधी कारवाई करताना अनेकदा पथकाला विरोधाचा सामना करावा लागतो त्यातून काही प्रसंगात अधिकारी देखील नियम धाब्यावर बसवून आणि वर्तन सोडून काम करतात मात्र अशीच आक्रमकता एका ‘ उत्साही ‘ अधिकाऱ्याला चांगलीच महागात पडलेली आहे . नवीन नाशिक येथील ही घटना असून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , डॉक्टर मयूर पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते मनपाचे सिडको विभागीय अधिकारी म्हणून काम पाहतात. अतिक्रमण कारवाई करत असताना संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर एका महिलेने केलेला असून डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह अतिक्रमण अधिकारी , कर्मचारी आणि चक्क एका तोतया पोलिसावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वृंदावन नगर येथील एका प्लॉटवर गेल्या पंचवीस वर्षापासून देखरेख प्लॉटची देखरेख करणे आणि वॉचमन म्हणून काम करत असलेल्या वंदनाबाई अंभोरे या त्यांच्या कुटुंबासोबत राहत असून जागेच्या मालकाने त्यांना कधीही तिथून जाण्यास सांगितलेले नाही मात्र असे असताना मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी तिथे आले आणि त्यांनी कोणतीही पूर्वसूचना आणि नोटीस न देता जागा मालकाच्या सांगण्यावरून ‘ जेसीबीने घर तोडून टाकू ‘ अशी धमकी दिली आणि संसार उपयोगी साहित्याचे नुकसान केले. फिर्यादी महिला यांनी आरोपींनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केलेला असून त्यानंतर डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा