घरफोडीमध्ये चक्क स्थानिक गुन्हे शाखेचा एक कर्मचारी , कारणही आले समोर..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचा एक कर्मचारीच चक्क घरफोडीमध्ये आरोपी असल्याचे आढळून आलेले आहे. चंद्रपूर पोलीस दलात यामुळे खळबळ उडालेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नरेश डाहुले असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत तो कार्यरत आहे . रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला अटक केलेली असून चोरी करण्यामागील कारण देखील समोर आलेले आहे. सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे गेलेल्या मुस्तफा रमजान शेख यांच्या घराचे कुलूप फोडून कपाटात ठेवलेली रोख रक्कम चोराने चोरून नेली होती.

चंद्रपूर शहरात सप्टेंबर महिन्यात एका ठिकाणी 80 हजाराची घरफोडी झालेली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी चक्क स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारीच चोरी करताना आढळून आला . शेअर ट्रेडिंगची त्याला सवय लागलेली होती त्यातून 22 लाखांचे कर्ज झाले म्हणून त्याने हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे.


शेअर करा