आठ दिवसात परिसरात फिरणारे मोकाट कुत्रे आणि जनावरांचा बंदोबस्त न केल्यास… ? : संपत बारस्कर यांचा इशारा

शेअर करा

अहमदनगर शहर आणि परिसरातील मोकाट कुत्रे आणि जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आम्ही वेळोवेळी केली होती, मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. येत्या आठ दिवसात परिसरात फिरणारे मोकाट कुत्रे आणि जनावरांचा बंदोबस्त न केल्यास आयुक्तांच्या दालनासमोर मोकाट जनावरांना सोडण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर व परिसरात सकाळी नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात तसेच औद्योगिक वसाहतीत देखील कामगार रात्री कामावर जात असतात. त्यांच्यावर भटकी कुत्री हल्ला करतात. यापूर्वी देखील असे प्रकार घडले आहेत. मोकाट कुत्रे आणि जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे ही बाब प्रशासनाच्या कानावर घातली. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. कोंडवाडा विभागाकडून यापूर्वी मोकाट कुत्रे आणि जनावरे पकडण्याचे काम केले जात होते परंतु अलीकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येत नाही त्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा संपत बारस्कर यांनी दिला आहे

शहर व परिसरातील मोकाट कुत्रे आणि जनावरे यांचा बंदोबस्त करण्याबाबत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी यापूर्वी चार वेळा महापालिकेला पत्र दिले होते मात्र संबंधित विभागाने त्या पत्राला केराची टोपली दाखवली त्यामुळे पुन्हा एकदा संपत बारस्कर यांनी स्मरणपत्र द्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या असल्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय जर लोकप्रतिनिधींनाच येत असेल तर सामान्य नागरिकांकडे किती दुर्लक्ष होत असेल याची कल्पनाही करवत नाही.


शेअर करा