प्रेम झाल्यावर विवाहाला देखील मान्यता पण ‘ झालं असं की.. ‘ , तरुणीचे टोकाचे पाऊल

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार ठाण्यात समोर आलेला असून व्यसनाधीन झालेल्या प्रियकराच्या सततच्या जाचाला कंटाळून एका 23 वर्षीय तरुणीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. दिवाळीतील ही घटना असून मुंब्रा पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , प्रतीक श्रीराम शिंदे असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याचे संपदा शांताराम पडवे ( वय 23 वर्ष राहणार डोंबिवली ) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते . 2021 पासून त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते त्यानंतर संपदा हिने घरच्यांना याप्रकरणी माहिती दिली आणि प्रतीक याच्यासोबत लग्नाला घरच्यांनी देखील मान्यता दिली.

दरम्यानच्या काळात प्रतिक दारूच्या आहारी गेला . दारू सिगारेट गुटखा अशा त्याच्या सततच्या व्यसनांमुळे संपदा हिने त्याच्यासोबत संबंध कमी केले मात्र त्यानंतर प्रतीककडून तिला धमकावणे सतत भांडण करणे तिला मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले. काही दिवसानंतर त्याने हाच प्रकार संपदा हिच्या घरच्यांच्या सोबत देखील सुरू केला त्यामुळे संपदा ही नैराश्यात गेलेली होती.

14 नोव्हेंबर रोजी संपदा हिच्या घरचे सर्वजण गावी गेलेले होते त्यावेळी रात्री ती फोन उचलत नसल्याची माहिती घरच्यांना समजली त्यानंतर संपदा हिच्या फोनवरून प्रतीक शिंदे याचा फोन आला की संपदा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगितले . संपदा हिची बहीण संचिता नेमाने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तिला कळवा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले मात्र तिचा मृत्यू झालेला असून प्रतीक शिंदे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गुन्हा मुंब्रा पोलिसांनी नोंदवलेला आहे.


शेअर करा