एका रुग्णावर उपचार करतेवेळी चूक झाल्यानंतर हतबल झालेल्या तरुणाच्या वडिलांनी न्याय मिळण्यासाठी स्थानिक पत्रकारांना आणि पोलिसांना देखील संपर्क केला . जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार असलेले संदीप महाजन यांनी त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला होता मात्र त्यानंतर अशा प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही अशी माहिती मिळाली म्हणून अखेर प्रकरण न्यायालयात पोहचले. सदर रुग्णालयाच्या संदर्भात पुन्हा एकदा खुलासा करणारी व्यवस्थित बातमी संदीप महाजन यांनी छापली मात्र त्यामुळे संदीप महाजन यांच्याविषयीच संभ्रम करणाऱ्या बातम्या छापण्यात आल्या . काही मीडिया माफिया तसेच सुपारी आणि तोडपाणी पत्रकारांनी हा प्रकार आपण त्यांच्या टोळीत येत नाही म्हणून केलेला असल्याचा आरोप संदीप महाजन यांनी केलेला असून आपले म्हणणे त्यांनी एका लेखी निवेदनातून नगर चौफेरकडे पाठवलेले आहे. आपण तोडपाणी आणि पाकीट पत्रकारिता करत नसून सत्य समाजापुढे घेऊन येतो त्यामुळे मीडिया माफिया असलेल्या टोळीकडून आपल्यावर गेल्या काही महिन्यांपासून निशाणा साधला जात आहे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे . संदीप महाजन यांच्यावर काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथे शिंदे गटाच्या आमदाराच्या गुंडांकडून हल्ला देखील करण्यात आला होता त्यामध्ये देखील ते मोठ्या प्रमाणात जखमी झालेले होते. विशेष म्हणजे संदीप महाजन हे स्वातंत्र्य सैनिक असलेल्या कुटुंबातून येतात.
संदीप महाजन यांचे काय आहे म्हणणे ?
संदीप महाजन यांनी वृंदावन हॉस्पिटल बाबतवरील पोस्ट प्रसारीत केल्यानंतर अनेकांनी कॉल करून विचारणा केली हे कसे तर संपादक या नात्याने मी स्पष्ट करू इच्छितो डॉक्टरांच्या विरोधात सुधाकर वाघ यांची बातमी आली ती मी संपादक या नात्याने डॉक्टरांना निरोप न पाठवता , फोन न करता ती बातमी तशीच्या तशी लावली कारण तोडी – पाणी हा आपला धंदा नाही तद्नंतर त्याच वृंदावन हॉस्पीटलचे डॉक्टर निळकंठ पाटील यांच्याबाबत चांगली बातमी आली ती सुद्धा प्रसारित केली अर्थात हे नैतीकता असलेल्या पत्रकारीतेचे कर्तव्य आहे मात्र ती बातमी प्रसारित होताच डॉक्टरांना ब्लॅकमेल करणाऱ्या लेखणी माफियाला एवढा तळतळाट झाला की त्याने स्वतःच्या ग्रुपवर माझ्याविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली नव्हे तर डॉक्टर आणि माझी सेटिंग झाली याची सुद्धा चर्चा करण्यास मागे राहीला नाही एवढेच काय तर सदर प्रकरणी थेट पाचोरा – भडगाव मतदार संघाच्या बाहेरील नेत्याचा डॉक्टरास आशीर्वाद असल्याचा देखील जावई शोध लावला
समस्त जनतेला या पोस्टद्वारे मी संपादक संदीप महाजन स्पष्ट करू इच्छितो की पाचोरा तालुक्यातील माहिजी येथील रुग्ण युवक याचे त्रस्त पिताश्री फुलचंद धनराज बडगुजर यांचे प्रकरण सर्व प्रथम गावाजवळच्या पत्रकाराने & एका पत्रकार संघटनेच्या पदाधिकारीने हाताळले. त्यांच्या स्तरावर शक्य न झाल्याने त्यांनी सदरचे प्रकरण माझ्याकडे पाठवले. मी संपुर्ण प्रकरणाची सत्य माहीती घेऊन & कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर थेट रुग्ण युवकाचे पिताश्री फुलचंद धनराज बडगुजर यांना माहीजी गावातील प्रतीष्ठीत लोकांसमोर स्पष्ट विचारून घेतले तुम्ही डॉक्टरांकडून पैसे घेण्यासाठी लढत असाल तर तुमच्या स्तरावर लढा त्याच्याशी माझा काही संबंध नाही न्यायासाठी लढत असाल तर मी शेवट पर्यंत तुमच्यासोबत आहे. रुग्णाचे वडील फुलचंद धनराज बडगुजर यांनी गावातील चार लोकांसमोर त्याच वेळी स्पष्ट केले की मला पैसे नको न्याय हवा म्हणुन मी संदीप महाजन यांनी सदरचे प्रकरण हाती घेऊन विधी तज्ञांच्या सल्ल्याने कागदपत्रे तयार केली. विशेष बाब म्हणजे उपचार अथवा हलगर्जी पणासंबधी डॉक्टरांच्या विरोधात थेट पो स्टे ला गुन्हा दाखल होत नाही हे त्यावेळी मला समजले.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जेव्हा कोर्टात केस दाखल करण्याची वेळ आली तेव्हा रुग्ण मुलाचे पिताश्री फुलचंद धनराज बडगुजर यांची आर्थीक परिस्थिती नव्हती परंतु मुलावर झालेला चुकीचे उपचार संदर्भात न्याय मिळावा हा त्यांचा उद्देश व स्वाभिमान होता. त्यांची ही जिद्द व भावना लक्षात घेऊन संपुर्ण केसचा खर्च मी स्वतः उचलला आणि 06 मार्च 2023 रोजी रजि. नं 23/2023 अन्वये आजही सदरची केस दाखल आहे व पुढील तारीख दि.12/12/2023 अशी कोर्टाने दिली आहे. विशेष बाब म्हणजे जे कोणी स्वतःला लेखणीचे शिलेदार म्हणून वावरतात & पाकीटाच्या लाईनीत उभे राहतात त्यांनी सुद्धा त्यावेळी सत्याच्या बाजुने उभे राहून बातमी लावण्याचा स्वाभिमान दाखवला नाही
आज मात्र डॉ निळकंठ यांच्या बाबतीत एक चांगली बातमी काय लावली तर जळफळाट झाला . पत्रकार संदीप महाजन मॅनेज झाल्याचा भोंगा वाजवु लागले ( वास्तविक मी मे कोर्टात दाखल केस दाखल केलेली नाही तर रुग्ण मुलाच्या वडीलांनी दाखल केली आहे & माघारीला सुद्धा त्यांचीच सही लागणार आहे ) परंतु आपल्या तोडी- पाणी टिम मध्ये पत्रकार संदीप महाजन येत नाही यांचे दुःख काही तथाकथीत लेखणीच्या शिलेदारांना ( ठेकेदारांना ) आहे व ते सतत राहणार हे मला माहीत आहे . मी आमदार किशोर पाटील शिवीगाळ व मारहाण प्रकरणी खुले चॅलेज देत & त्यावेळी प्रतीक्रीया देतांना पुढील बाब स्पष्ट केली होती आता पण जे सत्ता नसतांना निष्ठेने संकटकाळी नेत्यासोबत राहीले अशा परिश्रम घेणाऱ्या सैनीकांना डावलून मतलब साध्य करण्यासाठी काल पर्वा आलेले & ठेक्याचा मलीदा लाटत असलेल्या त्याच्या सर्व चट्या- पट्यांन्नी सुध्दा पुढील चॅलेज स्विकारावे.
” मे.न्यायदेवता व भारतीय राज्य घटनेवर या ध्येय वेड्याचा संपूर्ण विश्वास आहे. “सत्य परेशान होता है, पराजित नही” हे ब्रिद वाक्य माझ्या तोंडी सतत असते & जनतेच्या न्यायालयात योग्यवेळी योग्य निकाल जनता देणारच आहे.अर्थात त्यावेळी माझी भुमीका महत्वपुर्ण राहणार आहे एवढे निश्चित . आमदारांकडून मला झालेली शिवीगाळ व मारहाण प्रकरणी काही लाचार व पाकीटधार्जीन्य पत्रकार व संघटना यांनी माझ्या विरोधात जेष्ठ मान्यवरांकडे चुकीचे संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला मात्र मी पत्रकार संदीप महाजन यांनी त्यावेळी मान्यवरांना विनंती केली होती मी किंवा पाकीटधार्जीने पत्रकार काय सांगतात यावर विश्वास न ठेवता आपल्या स्तरावरून शोधपत्रिकारितेच्या माध्यमातून आपण शहर व तालुक्यातील आजी-माजी विविध विभागाचे शासकिय अधिकारी, राजकीय मान्यवर, सर्व धर्मिय संघटना, व्यापारीसह समाजातील जे महत्वपूर्ण घटक आहेत अशा व्यक्तींकडून माझ्या भुतकाळ व वर्तमानातील चौकशी करून सत्यता पडताळावी या विनंतीला मान देवून पत्रकार संघटना व पत्रकार क्षेत्रातील जेष्ठ मान्यवर यांनी सखोल चौकशी केली आणि माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले हिच माझी पहिली सत्यतेची पावती म्हणता येईल.
तसेच त्यावेळी सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील व त्यांचे पदाधिकारी, समर्थक तसेच संदीप महाजन यांचे छुपे उघड जे कोणी विरोधक असतील त्यांना पत्रकार संदीप महाजन यांनी जाहिर चॅलेंज केले होते व त्या चॅलेंजवर संदीप महाजन आजही ठाम आहे. माझ्यावर जे तोडी- पाणी सह जे आरोप केलेले आहेत त्याची प्रेस नोटची कॉपी व व्हिडीओ आजही माझ्याजवळ आहे ते त्यांनी पडताळून बघावे आणि ते जर सिध्द केले तर मी पत्रकार क्षेत्रातून संन्यास तर घेईलच सोबतच पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसुन डोळ्याच्या भुवयांसह मुंडन करेल आणि पाचोराच काय महाराष्ट्र राज्य सोडून चालला जाईल अन्यथा त्यांनी करावे याचे कारण म्हणजे मी संदीप महाजन यांनी जो पण व्यवसाय केला तो लोकांची गरज लक्षात घेवून आणि कोणाचाही तळतळाट न घेता व्यवसाय केला आहे तसेच ज्यांना कोणाला माझ्या प्रकरणात माझ्या मालमत्तेसह इतर कोणत्याही फाईली बनवायच्या असतील त्यांना देखिल चॅलेंज आहे कोठेही इकडे-तिकडे माहिती अधिकार अर्ज टाकून माझ्याबाबत कागदपत्रे व माहिती प्राप्त होत नसेल तर त्याची माहिती माझ्याकडे थेट मागावी.
माझे वडील स्वातंत्र्य सैनिक स्व.दामोदर लोटन महाजन हे वर्ग आठवीत असतांना भारतीय स्वातंत्र्य चलेजाव चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना दि.25।09।1942 ते दि.01।03।1943 पावेतो येरवडा जेलचा कारावास भोगलेला आहे. त्याचे येरवडा जेलचे इंग्रजकालीन कारावास भोगल्याचे पत्र (सर्टिफिकेट)(No.JU-II/2/658)चे उपलब्ध आहेत. किंबहुना त्यांच्या स्वातंत्र्य चळवळी कार्यासंदर्भात खान्देश इतिहास राज्य परिषदेत शोध निबंध देखिल सादर करण्यात आला आहे. मी माझे दैवत पिताश्री यांची आजही शपथ घेऊन सांगतो माझी & माझ्या परिवाराची माहीती संपूर्ण पारदर्शक व स्पष्ट आहे म्हणुन कोणाला मी व माझ्या कुटूंबाच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहारसह कोणत्याही स्तरावरील फाईली बनविण्यासाठी कागदपत्रे लागत असतील तर मी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या साक्षीने – शपथेने पाचोरा येथील हुतात्मा स्मारकात ऑन व्हिडीओ कॅमेरा स्व:खर्चाने माहिती देण्यास तयार आहे. माझ्या जिवनाची किताब म्हणजे खुली किताब आहे कोणालाच काही भेटणार नाही कारण मी कोणत्याही महीलेला पुढे करून 9 लाखाची तोडी – पाणी केली नाही किंबहुना ज्याच्या जिवावर मोठा झालो त्याच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. विशेष म्हणजे जे केले – बोललो & लिहीले ज्या ग्रुप मध्ये समोरचा व्यक्ती नाही . त्या ग्रुपमधे त्याच्या विरोधात लिहीत नाही . जे केले ते समोरा-समोर सांगुन केले म्हणुन चॅलेज देत आहे माझ्या भानगडीत पडू नका मी अंतर आणि बाह्य स्पटिकासारखा स्वच्छ & पारदर्शक आहे
डॉ. निळकंठ पाटील यांच्या बाबतीत सुद्धा गर्वाने सांगेल की डॉक्टरचा & माझा वाद वैयक्तीक नाही आहे तो माहीजी रुग्ण प्रकरणावरून आणि तो जगजाहीर असतांना सुद्धा काही जणांनी आमदार आणि माझ्या प्रकरणात डॉ. निळकंठ पाटील यांना ओढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुद्धा डॉ. निळकंठ पाटील यांनी मर्द मराठा आवाजात स्पष्ट केले पत्रकार संदीप महाजन हे माझ्याकडे कधीच पैसे मागायला ,पावती फाडायला, पुरस्कार विकायला आले नाही किंवा कोणत्याही मार्गाने पैसे मागीतले नाहीत याला म्हणतात आझाद शत्रुत्व..म्हणुनच मी आज- उद्या त्यांच्या काय कोणाच्याही चांगल्या कृती आणि कामासोबत आहे व चुकीचे काम असेल तर तशीही वेळ पडल्यास विरोधात भुमीका घेण्यास तयार आहे