न्यायालयासमोर भलेभले मी मी म्हणणारे लोक गार होतात आणि स्वतःच्या अहंकारात अडकलेल्या सरकारी विभागांना देखील चांगलीच चपराक बसते .परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस स्टेशनमध्ये हवलदार आणि हेड कॉन्स्टेबल सुट्टीकालीन कोर्टात तीस मिनिटे उशिरा पोहोचले म्हणून कोर्टाने त्या दोघांना आयुष्यभर लक्षात राहील अशी शिक्षा ठोठावलेली आहे दोन्ही व्यक्तींना न्यायालयाने परिसरातील गवत छाटण्याचे काम दिलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सदर दोन्ही पोलीस हे रात्रीच्या गस्तीवर असताना 22 ऑक्टोबर रोजी पहाटे मानवत इथे त्यांनी दोन जणांना संशयास्पद परिस्थितीत फिरत असताना त्यांनी ताब्यात घेतलेले होते. सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते मात्र पोलिसांकडून सुमारे 30 मिनिटांचा उशीर झाला आणि न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना गवत कापण्याचे आदेश दिले.
न्यायालय अचानकपणे असे आदेश देईल याची त्यांना कुठलीच कल्पना नव्हती त्यामुळे ते गडबडून गेले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना या संदर्भात माहिती दिली. पोलीस स्टेशन डायरीदेखील त्याची नोंद करण्यात आलेली असून हा अहवाल त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आलेला आहे.