मिरचीची पूड फेकून लुटणारे तीन जण ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

शेअर करा

नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून रस्त्यात दुचाकी आडवी उभी करून एका व्यक्तीच्या डोळ्यात पूड फेकून लुटणाऱ्या तीन जणांना तीन जणांना लुटण्याचा प्रकार समोर आलेला होता. अवघ्या 24 तासात पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केलेली असून त्यांच्याकडून लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , महेश भालचंद्र मोरे ( वय 25 ) , अजय माणिक घेंगडे ( वय 19 दोघेही राहणार राजापूर मठ तालुका श्रीगोंदा ) आणि राहुल प्रभू गव्हाणे ( वय 20 राहणार बेलवंडी फाटा तालुका श्रीगोंदा ) अशी आरोपींची नावे असून लोणी व्यंकनाथ रोडवर हा प्रकार लुटीचा प्रकार घडलेला होता.

21 तारखेला श्रीगोंदा तालुक्यातील बोरी येथील रहिवासी असलेले नितीन आढागळे हे चार चाकी वाहनातून लोणी व्यंकनाथ येथे जात असताना पाठीमागून आलेल्या तीन जणांनी त्यांच्या चार चाकीला दुचाकी आडवी लावली आणि त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील एक लाख 16 हजार रुपये आणि दोन मोबाईल असा ऐवज घेऊन पलायन केलेले होते.

फिर्यादी यांनी त्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तात्काळ जाऊन गुन्हा नोंदवला आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देखील समांतर तपास सुरू केलेला होता . परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले आहे . अवघ्या 24 तासात पोलीस पथकाने ही कामगिरी केली असल्याने पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे.


शेअर करा