मेहेकरी इथे संविधान दिन मोठ्या उत्साहात ,संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन

शेअर करा

मेहेकरी इथे भिमराज ग्रुपच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात संविधान दिन मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला . दिवसभर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून संध्याकाळी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संविधानाच्याउद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

शशिकांत पंडित यांनी यावेळी बोलताना, ‘ स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद या मूल्यांची जोपासना करत भारतीय नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार व कर्तव्य ज्या दिवशी मिळाले तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर परंतु राजकारणातील अराजकता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, रस्त्या-रस्त्यावर होणारे गटा-गटांतील संघर्ष, लहान-सहान कारणांसाठीही होणाऱ्या हत्या, शब्दा-शब्दाने पेटणारे रणकंदन, राजकारण्यांची शिवराळ भाषा, इतिहासाचे विडंबन, राष्ट्रपुरुषांची अवहेलना यामुळे संविधानातील सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता, हे सगळे भासमान वाटतंय. खरंच प्रत्येक व्यक्तीला हे अधिकार मिळाले तरच संविधान दिन साजरा करण्याचा अधिकार आपल्याला आहे. असे म्हटलेले आहे .

किरण कानडे,शाहू पंडित,अमोल कानडे,नितीन कानडे,अशोक पंडित,किशोर कानडे, ईश्वर पंडित,प्रणव पंडित,सनी पंडित ,विश्वास पंडित , सुयोग पंडित, सागर कानडे, रवी पंडित,मोहित पंडित,सनी शेलार इ.कार्यकर्ते उपस्थित होते.अमोल कानडे यांनी यावेळी प्रास्ताविक केले व किरण कानडे यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.


शेअर करा