फक्त तीन दिवसात त्रेचाळीस लाख रुपये ‘ स्वाहा ‘, ऑनलाईन जाळ्यात ओढलं अन..

शेअर करा

महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत असा प्रकार नाशिक शहरात समोर आलेला असून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करा असे सांगत एका व्यक्तीला तब्बल 44 लाख रुपयांना फसवण्यात आलेले आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि त्यानंतर सायबर भामट्यांनी हातवर केले.

उपलब्ध माहितीनुसार , मिलिंद तीर्थराज पाटील ( वय तीस वर्ष राहणार त्रिमूर्ती नगर जेलरोड ) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केलेली असून गेल्या काही महिन्यात पाटील हे गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत असताना इंटरनेटवर त्यांना क्रिप्टो करन्सीविषयी माहिती मिळाली त्यानंतर संबंधित आरोपींनी व्हाट्सअप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून त्यांच्यासोबत संपर्क साधला. पाटील यांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले.

29 ऑक्टोबर पासून एक नोव्हेंबर पर्यंत म्हणजे अवघ्या तीन दिवसात पाटील यांनी तब्बल 43 लाख 22 हजार 950 रुपयांची गुंतवणूक केली मात्र वीस दिवस उलटून देखील कुठलाही परतावा मिळाला नाही म्हणून सायबर भामट्यांशी संपर्क साधला त्यावेळी हे फोन स्विच ऑफ असल्याचे लक्षात आले . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतलेली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती आहे.


शेअर करा