मराठा आरक्षणासाठी आणखीन एकाचे टोकाचे पाऊल

शेअर करा

मराठा आरक्षणासाठी नव्याने सुरू झालेल्या संघर्ष यात्रेत आत्तापर्यंत तब्बल 55 पेक्षा अधिक व्यक्तींनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केलेल्या असून पुन्हा एकदा असाच प्रकार परभणी जिल्ह्यात समोर आलेला आहे. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी एकच मिशन मराठा आरक्षण अशी चिठ्ठी लिहून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेतलेला आहे. गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला इथे गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता ही घटना उघडकीला आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पवन विष्णुकांत भिसे ( वय 24 वर्ष राहणार पिंपरी झोला ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत गंगाखेड इथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला त्याने उपस्थिती देखील लावलेली होती . घरी गेल्यानंतर त्याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अशी चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्यानंतर राहत्या घराच्या पत्र्याखालील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.

गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद सावंत , पी टी शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलेला असून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात मयत पवन याचा मृतदेह आणण्यात आलेला होता .


शेअर करा