तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची शक्यता , प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

शेअर करा

देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी करून पुन्हा वैदिक परंपरा सुरू केल्या जात आहेत त्यामुळे केव्हाही जातीय दंगली होण्याची शक्यता आहे असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. पुणे येथे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की राज्यात तीन डिसेंबरनंतर दंगली होण्याची शक्यता असून जातीय सलोखा होऊ राखला जावा यासाठी वेगवेगळ्या मुस्लिम संघटना आणि धर्मगुरूंनी एकत्र येत शांती सभेचे आयोजन केलेले आहे. आठ डिसेंबर रोजी मुंबईत ही सभा होणार आहे.

महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त फुले वाड्यामध्ये आलेले असताना ते म्हणाले की , ‘ मध्य प्रदेश , राजस्थान , तेलंगाना मिझोराम या राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर दंगलीची शक्यता असून राज्यात अनेक ठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती आहे. कुठल्याही परिस्थितीत काहीही घडू शकते. दोन समाजांना टार्गेट केलेले जात असून समाजाला एकमेकांच्या विरोधात लढवले जात आहे .’

इजराइल पॅलेस्टाईन युद्धाची व्याप्ती वाढली तर भारतावर त्याचा परिणाम होईल. आखाती देशात पाच कोटींपेक्षा जास्त भारतीय लोक राहतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील सरकारला पावले उचलावी लागतील असे देखील त्यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मुद्द्याकडे धर्माच्या चष्म्यातून पाहू नये आणि ज्यांचा ओबीसी लढ्याशी काहीही संबंध नाही अशी लोक काहीही वक्तव्य करून राज्यात दंगल कशी होईल अशी परिस्थिती निर्माण करू पाहत आहे त्यापासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे.


शेअर करा