सेल्फीचा नाद नडला ..पुण्यात दोन तरुण गेले वाहून : कधी घडली घटना ?

  • by

पुणे शहरातील बाबा भिडे पुलाखालील नदीपात्रात सेल्फी काढण्यास उतरलेले दोन तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल व डेक्कन पोलीस दाखल झाले असून बेपत्ता तरुणाचा अद्याप शोध लागलेला नाही. Two young men were swept away in the floodwaters Pune

ओम तिमप्पा तुपधर (वय १८) आणि सौरभ सुरेश कांबळे (वय २०) अशी या दोघांचे नावे असून दोघेही ताडीवाला रोड या भागातील राहणारे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

आज सायंकाळी सहाच्या सुमारास सौरभ व ओम आणि दोन मित्र बाबा भिडे पुलाजवळील नदीपात्रात फोटो काढत होते. कपडे काढून ते पाण्यात उतरून फोटो काढत असताना एकजण वाहून जाऊ लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सौरभ गेला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. यावेळी तिसऱ्या मित्राने व नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवनांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांचा शोध घेतला जात आहे. पण त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.