भारतीय रुपयाचे सतत अवमूल्यन ,अफगाणी चलनापेक्षाही खूप खूप खाली ..

शेअर करा

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय रुपयाचे सतत अवमूल्यन होत असून भारतीय रुपया चक्क आता अफगाणिस्तानच्या करन्सीच्या देखील खूप खाली आलेला आहे . एकेकाळी रुपयाची असणारी किंमत इतर चलनाच्या तुलनेत सातत्याने घसरलेली असून डॉलरच्या तुलनेत सध्या रुपया 83.36 इतक्या खालच्या पातळीवर आलेला आहे . देशात असलेली बाजारातील नकारात्मक भावना आणि एफआयआय हा यामुळे रुपयाचे सतत अवमूल्यन होत असून चक्क अफगाणी चलन देखील एका डॉलरच्या तुलनेत ६९.५५ वर आहे .

एकीकडे केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे दावे केले जातात तर दुसरीकडे मात्र भारतीय रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होताना दिसून येत आहे . ग्लोबल ट्रेड रिसर्च इनोवेशन यांनी भारतासाठी एक सल्ला दिलेला असून त्यामध्ये भारतीय रुपया मजबूत करण्याची ही वेळ नाही . भारतीय अर्थव्यवस्था सध्याच्या टप्प्यात आहे त्या अवस्थेत रुपयाच्या मजबुतीमुळे अनेक क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आज रोजी भारताने मध्यम उत्पन्नाचा देश बनण्यावर अधिक भर दिला पाहिजे असे म्हटलेले आहे.


शेअर करा