‘ ह्या ‘ व्यक्तीच्या मृत्यूने पेटली अख्खी अमेरिका ? कोण आहे हा व्यक्ती घ्या जाणून ?

शेअर करा

अमेरिकेच्या 75 हजारहून अधिक शहरांमध्ये निदर्शने झाली आहेत. जी शहरं कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे पूर्णपणे बंद होते आणि रस्ते ओस पडले होते. तेथे आता संतप्त जमाव रस्त्यावर उतरून निदर्शन करत आहे. अमेरिकेत दंगलीच्या आरोपाखाली 4,100 जणांना अटक करण्या आली आहे. जागोजागी नॅशनल गार्डचे जवान गस्त घालत आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उसळलेल्या हिंसक आंदोलनावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.लोकांची गर्दी पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणाने लगेच गुप्त बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली आहेत. ज्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प लपलेले आहेत तो बंकर इतका शक्तिशाली आहे की या बंकरवर रॉकेट, क्षेपणास्त्र वैगरे सोडा अणुबॉम्बने हल्ला केला तरीदेखील बंकरमध्ये असणाऱ्या व्यक्तींना काहीही होणार नाही .

जगातला मानवता आणि लोकशाहीवरुन धारेवर धरणाऱ्या अमेरिकेतच सर्व आलबेल नसल्याचे ह्या गोष्टीवरून स्पष्ट झाले आहे . अमेरिकेत गोऱ्या आणि कृष्णवर्णीय लोकांमध्ये भेदभाव केला जातो हे देखील ह्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. बहुतांश केसेसमध्ये आफ्रिकन वंशाच्या लोकांना मुद्दामहून अडकवले जाते तर गोऱ्या लोकांना मात्र काही प्रमाणात सूट दिली जाते . डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या विचारधारेची सत्ता असल्यापासून अमेरिकेत हे प्रकार वाढले आहेत.

मुळात ह्या सर्व गोष्टीची सुरु कशी झाली ?

मृत झालेले जॉर्ज फ्लॉईड हे मूळचे टेक्सासमधील हस्टनमधील असून कामानिमित्ताने ते गेल्या काही वर्षांपासून मिनियापोलीस येथे स्थायिक झाले होते. इथे ते बाऊंसरचे काम करत होते. पण कोरोना व्हायरस आरोग्य संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात फ्लॉईड यांचीही नोकरी गेल्याने त्यांच्यावर मिनियापोलीस इथे स्थायिक होण्याची वेळ आली. जिथून सिगारेट घेतल्यावरून हा प्रकार सुरु झाला त्या कप फूड्स दुकानात देखील जॉर्ज फ्लॉईड नेहमी येत असत. त्यांचा चेहरा ओळखीचा झाला होता. त्यांनी कधीच कुठलाही त्रास दिला नाही, अशी प्रतिक्रिया दुकानाचे मालक माईक अबूमयालेह यांनी एनबीसीशी बोलताना दिली आहे. मात्र घटनेच्या दिवशी ते दुकानात हजर नव्हते. संशायस्पद नोटेची तक्रार नोंदवताना दुकानाचा तरुण कर्मचारी केवळ नियमाचं पालन करत होता. फ्लॉइडवर फक्त आरोप होता एका दुकानदाराला 20 डॉलर्सची खोटी नोट दिल्याचा..

पोलिसांना संपर्क केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. फ्लॉईड कोपऱ्यात पार्क केलेल्या कारमध्ये इतर दोन लोकांसोबत बसले होते.पोलीस अधिकारी थॉमस लेन गाडीजवळ गेले. त्यांनी पिस्तूल बाहेर काढलं आणि फ्लॉईड यांच्या दिशेनं रोखून त्यांना हात वर करण्यास सांगितले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यानं इतक्याश्या कारणावरून पिस्तूल का रोखली ? याचे स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.

थॉमस लेन यांनी फ्लॉईड यांना कारबाहेर ओढल्याचं फिर्यादीच्या वकिलांचं म्हणणं आहे. त्यानंतर बेड्या ठोकताना फ्लॉईड यांनी विरोध केल्याचंही वकिलांनी सांगितलं आहे.”बनावट डॉलर दिल्याप्रकरणी फ्लॉईड यांना अटक केल्याची माहिती लेन यांनी दिली. बेड्या ठोकल्यानंतर फ्लॉईड यांनी सहकार्य केल्याचं लेन यांनी मान्य केलंय.मात्र जेव्हा पोलीस अधिकारी फ्लॉईड यांना गाडीत न्यायला लागले तेव्हा संघर्षाला सुरुवात झाली.

तोपर्यंत डेरेन शॉविन घटनास्थळी पोहचले. इतर पोलीसांच्या मदतीने त्यांनी फ्लॉईड यांना पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. 8 वाजून 19 मिनिटांनी शॉविन यांनी फ्लॉईड यांना गाडी बाहेर खेचले. ज्यामुळे ते जमिनीवर आदळले. ते तसेच खाली पडून होते. खाली पडलेले असताना त्यांचे हात तसेच बांधलेले होते.यावेळी प्रत्यक्षदर्शींनी व्हीडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. फ्लॉईड यांना प्रचंड त्रास होत असल्याचं या व्हिडिओत दिसून येतंय. ही दृश्यं अनेकांनी आपल्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली. सोशल मीडियावरही व्हायरल केली. हा व्हीडिओ फ्लॉईड यांचा अखेरचा व्हीडिओ ठरला. डेरेन शॉविन यांनी तब्बल 8 मिनिटं 46 सेकंद फ्लॉईट यांची मान गुडघ्यानं दाबून धरल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. ‘मला श्वास घेता येत नाहीय,’ असं फ्लॉईड वारंवार पोलिसांना सांगत होते. विनवणी करत होते मात्र पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही .

सहा मिनिटांनंतर फ्लॉईड यांच्याकडून प्रतिसाद बंद झाला. व्हीडिओमध्य फ्लॉईड अचानक शांत होऊन निपचित पडल्याचं दिसतंय. त्यानंतर तिथे जमलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना त्यांची नाडी तपासण्यास सांगितलं. कूएंग यांनी फ्लॉईड यांच्या उजव्या मनगटाची नस तपासली, पण ठोके सापडत नव्हते. तरीही अधिकाऱ्यांनी फ्लॉईड यांना सोडलं नाही.8 वाजून 27 मिनिटांनी शॉविन यांनी फ्लॉईडच्या मानेवरुन गुडघा काढला. तोपर्यंत फ्लॉईड यांची हालचाल बंद झाली होती. त्यांना रुग्णवाहिकेतून हेनपिन काऊंटी वैद्यकीय केंद्रात नेले. त्यानंतर तासाभरानंतर फ्लॉईड यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

दरम्यान ह्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि अनेक वर्षे भेदभावाचा सामना करत असलेल्या कृष्णवर्णीय लोकांना या विषयी आवाज उठावासावा वाटला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शनास सुरुवात केली .

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्याने वाद आणखी वाढला

मिनिआपोलिसमध्ये हिंसक निदर्शन करणाऱ्या निदर्शकांना ट्रंप यांनी ‘दंगलखोर’ म्हटलं. ते बाहेरच्या राज्यांमधून मिनिआपोलिसमध्ये गेले होते आणि हा गुन्हा आहे, असे देखील ट्रम्प म्हणाले त्यामुळे कृष्णवर्णीय नागरिकांच्या जखमेवर ट्रम्प यांनी आणखी मीठ चोळण्याचे काम केले.

ट्रम्प यांचा बालिशपणा इतक्यावर न थांबता त्यांनी पुढे जाऊन मीडियावर देखील तोंडसुख घ्यायला सुरु केले . CNN, New York Times, Washington Post यांसारखी माध्यमं फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोपही ट्रंप यांनी ट्विटरवरून केला. मात्र इतक्यावर देखील न थांबता आपले अपयश लपवण्यासाठी त्यांनी ह्या गोष्टीचे खापर अँटिफा ही कट्टर डाव्या विचारांची संघटनेवर देखील फोडून पाहिले. पुढे जाऊन ट्विटरच्या फॅक्ट चेक टीमवर देखील संशय व्यक्त केला आणि आता तर फेसबुक व ट्विटर यावर काही प्रमाणात असलेले सरकारी संरक्षण काढून घेण्याच्या आदेशावर देखील ट्रम्प आणि सही केली आहे . डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाच्या बाबतीत तसेच येथील परिस्थिती हाताळण्यात पूर्ण अपयशी ठरत असल्याची टीका आता तेथील विरोधी पक्ष करत आहेत . सलग तीन दिवसापासून व्हाईट हाऊसच्या बाहेर जोरदार निदर्शने झाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चक्क बंकरमध्ये आसरा घेण्याची वेळ आलेली आहे .

संबंधित बातम्या

अखेर हसीन जहाँने सोशल मीडियावर शेअर केला ‘ न्यूड ‘ फोटो , सोबत लिहले असे काही की ..
https://nagarchaufer.com/?p=233

एका मुलीची आई अविवाहित युवकाच्या प्रेमात, नवरा सोडून धरला प्रियकर मात्र ? : महाराष्ट्रातील बातमी #ExtraMaritalAffair
https://nagarchaufer.com/?p=239

अमित शाह यांना ‘ आत्मनिर्भर ‘ म्हणताच येईना.. सत्यजित तांबे यांनी केला व्हिडीओ शेअर : पहा व्हिडीओ
https://nagarchaufer.com/?p=242

महाराष्ट्र सरकारची देखील नवीन नियमावली जाहीर .. पहा काय सुरु काय बंद ?
https://nagarchaufer.com/?p=246

महत्वाची बातमी .. पेट्रोल डिझेल आणि गॅसमध्ये आजपासून भाववाढ, काय आहेत नवीन दर ?
https://nagarchaufer.com/?p=255

पंकजा मुंढे यांनी मनावर दगड ठेवून घेतला ‘ हा ‘ निर्णय .. काय केले कार्यकर्त्यांना आवाहन ?
https://nagarchaufer.com/?p=260

व्हाईट हाऊसच्या बाहेर जोरदार राडा चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंकरमध्ये लपण्याची वेळ : सविस्तर वृत्त
https://nagarchaufer.com/?p=267


शेअर करा