‘ किरणशेठ सेम तुमच्या मोटारसायकलसारखी दुसरी दुचाकी ‘ , वाट पाहिली अन..

शेअर करा

नगर जिल्ह्यात पाथर्डी इथे दुचाकी चोरणाऱ्या एका व्यक्तीला नागरिकांनी पकडून अखेर पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. अटक केलेल्या व्यक्तीने इतरही अनेक मोटरसायकल चोरल्याचा संशय असून त्याने कुठे कुठे हे प्रकार केलेले आहेत याची सध्या पोलीस चौकशी करत आहे.

उपलब्ध माहितीनुसार , राहुल आजिनाथ शिंदे ( राहणार चिंचपूर ) असे आरोपी संशयित व्यक्तीचे नाव असून पाथर्डी शहरातील व्यापारी किरण पुरी यांची मोटरसायकल 8 ऑक्टोबर रोजी चोरीला गेलेली होती त्यानंतर ही मोटार सायकल भगवान गॅस एजन्सीचे संचालक असलेले अमोल गरजे आणि त्यांचे सहकारी मुकुंद गरजे यांना दिसली त्यानंतर त्यांनी पुरी यांना बोलावून ही मोटर सायकल त्यांची असल्याची खात्री करून दिली.

काही वेळात राहुल शिंदे तिथे आला आणि त्याने मोटरसायकल चालू केल्यानंतर अमोल गरजे आणि मुकुंद गरजे सोबतच किरण पुरी यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले . आरोपीचे साथीदार किती आहेत आणि अशाच पद्धतीने त्यांनी किती चोऱ्या केलेल्या आहेत याचा देखील सध्या तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी दिलेली आहे.


शेअर करा