सबजेल चौकात घरफोडी , सकाळी दाम्पत्य आले तर..

शेअर करा

नगर शहरातील सबजेल चौक परिसरात एक बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून त्यातून रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेलेला आहे . 29 तारखेला बुधवारी हा प्रकार समोर आलेला असून कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , जहीर अजगर सय्यद ( वय 40 वर्ष राहणार सबजेल चौक अहमदनगर ) असे फिर्यादी शिक्षक यांचे नाव असून ते चांद सुलताना हायस्कूल इथे शिक्षक म्हणून नोकरी करतात. त्यांची मुलगी आजारी असल्याकारणाने ते त्यांचे वडील राहत असलेल्या बालिकाश्रम रोड इथे 24 नोव्हेंबर पासून राहायला गेलेले होते.

सबजेल चौक येथील घरात ते आणि त्यांच्या पत्नी चौकातील साफसफाई करण्यासाठी 29 तारखेला सकाळी सात वाजता गेले त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता आणि कुलूप देखील तुटलेले होते. आतमध्ये जाऊन पाहणी केली त्यावेळी कुलूप उघडून आतील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने गायब झालेले होते.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून दहा हजारांची रोख रक्कम आणि नऊ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेलेले असून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकासह तिथे जाऊन पाहणी केली. कोतवाली पोलिसात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा