..अखेर वाघाच्या पिंजऱ्यात वनविभागाचे कर्मचारीच शिफ्ट लावून बसले : पुढे काय झाले ?

  • by

नरभक्षक वाघ वा बिबट्याला बेशुद्ध करून पकडले जाते किंवा पिंजऱ्यात बकरीचे आमिष दाखवून जेरबंद केले जाते.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात दहा जणांचे बळी घेणारा आर टी -१ वाघ अधिक हुशार असून असल्या प्रयोगांना जुमानत नसल्याचे समोर येताच त्याच्याही पुढे असणाऱ्या वनविभागाने चक्क आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांनाच पिंजऱ्यात बसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. In Chandrapur the forest department staff sat in the cage to catch the tiger

पिंजऱ्यात कोण किती वेळ बसणार ? याचे वेळापत्रक वनविभागाने तयार केले आहे. सायंकाळी ६ ते सकाळी ८ असे तब्बल १४ तास त्यांना पिंजऱ्यात बसविले जात आहे. राजुरा वनक्षेत्रात ११ ऑक्टोबरपासून ते १८ ऑक्टोबरपर्यंत राबविला जाणार आहे.सहा दिवस झाले पण अद्याप देखील वाघ तिकडे फिरकला देखील नाही. माणसे बदलून देखील वाघाला माणसासाठी पिंजऱ्याजवळ जाण्याची गरज वाटत नसावी.

राजुरा वनक्षेत्रासह परिसरातील वनक्षेत्रात आरटी-१ वाघाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या वाघाने दहा जणांचा बळी घेतला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला जेरबंद करा किंवा ठार मारा असा शेतकऱ्यांचा राजकीय दबाव वनविभागावर वाढला आहे. वाघोबा शॉर्प शूटरच्या निशाण्यावरही येत नसल्याने वनविभाग हतबल झाला आहे. अखेर वनविभागाला बकरीऐवजी वनपाल, वनरक्षक व वनमजुराला यांनाच बसवावे लागले मात्र तरीदेखील त्याला पकडण्यास यश आलेले नाही.

बिबट्या विहिरीत पडला वा वाघ जखमी अवस्थेत आहे, अशावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी मनुष्याला पिंजऱ्यात बसवून जवळ नेले जाते. त्यानंतर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करणे सहज शक्य होते. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी वनविभागात एका जखमी वाघाची जवळून माहिती घेण्यासाठी हा प्रयोग केला होता, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.