संग्राम भैय्यांनी सांगितलं , आयुक्तांनीही ऐकलं पण ९ डिसेंबरपर्यंतच..

शेअर करा

अहमदनगर महापालिकेचा कर थकला म्हणून महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचा दावा सतत महापालिकेकडून करण्यात येतो तर दुसरीकडे महापालिकेचे वेगवेगळे घोटाळे रोज समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील करदाते कर भरण्यास तयार आहेत मात्र आयुक्त यांनी फक्त 50000 रुपयांच्या पुढील करदात्यांना शास्तीमाफीचा लाभ दिलेला होता तो लाभ सरसकट सर्व करदात्यांना द्यावा आणि 75 टक्के शास्ती माफी करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे केलेली होती. आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही शास्तीमाफी जाहीर केली आहे …

आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले होते की , ‘ शहरातील अनेक करदात्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला असून महापालिकेने फक्त 50 हजार रुपयांच्यावरच शास्तीमाफी दिलेली आहे. सर्व करदात्यांना सरसकट 75 टक्के शास्ती माफीचा लाभ मिळाला तर सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात कर भरतील आणि महापालिकेच्या देखील आर्थिक परिस्थितीत बदल होईल .’

अनेक नागरिकांच्या मालमत्ता करांमध्ये अतिरिक्त दंड शास्ती कर लागलेला आहे . आपल्या अधिकारात ७५ टक्के शास्ती माफी सूट तुम्ही दिली तर अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे थकबाकी भरून टाकतील आणि मोठ्या प्रमाणात महापालिकेची परिस्थिती देखील सुधारेल त्यामुळे आपण 75 टक्के शास्ती माफीचा निर्णय सरसकट सर्वांना द्यावा ‘, अशी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे केलेली होती. आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी त्यानंतर ही शास्ती माफी जाहीर केलेली असून मुदत मात्र फक्त ९ डिसेंबरपर्यंतच ठेवण्यात आलेली आहे.


शेअर करा