खाकीला काळिमा ..’ ऐकवू का तुझ्या नवऱ्याला तू काय बोलली ‘

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना जळगाव इथे समोर आलेली असून एका विवाहित महिलेची कॉल रेकॉर्डिंग तिच्या पतीला ऐकवण्याची धमकी देत व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य आरोपीकडून करण्यात आलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा चक्क पोलीस कर्मचारी असून त्यानंतर त्याच्या विरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , शहरातील एका विवाहित महिलेला तिच्या पतीच्या विरोधात असलेल्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी ओळख झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्या आईचा नंबर घेत विवाहित महिलेसोबत संपर्क साधलेला होता. आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांने त्यानंतर अनेकदा तिच्या फोनवर फोन केले आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

विवाहित महिलेने त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिला त्यानंतर आरोपीने तिला ‘ जर तू माझ्याशी फोनवर बोलली नाही तर यापूर्वी तु जे काही बोललेली आहे ते तुझ्या पतीला ऐकवील ‘, अशी तिला धमकी दिली. आरोपीने त्यानंतर व्हिडिओ कॉलवर विवाहित महिलेसमोर अश्लील कृत्य केले. महिलेने त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे.


शेअर करा