वीज बिलाची थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महिलेला घेरलं , दोघांवर गुन्हा दाखल

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार मुंबईत समोर आलेला असून महावितरणकडून वीज बिलाची थकबाकी वसुली करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे . नवघर पोलिसात याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सचिन मनोहर बोराडे आणि योगेश मनोहर बोराडे अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून 21 नोव्हेंबर रोजी वीज बिल थकबाकी वसूल करण्याच्या उद्देशाने फिर्यादी महिला यांनी आरोपी व्यक्तीचा वीजपुरवठा खंडित केलेला होता. सचिन मनोहर बोराडे आणि योगेश मनोहर बोराडे यांनी वीज पुरवठा खंडित केलेला पाहिल्यावर फिर्यादी महिला यांच्या अंगावर धावून जात धमकी देत त्यांना अश्लील शिवीगाळ केली.

वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने आपण हा प्रकार करत आहोत असे फिर्यादी महिला यांनी त्यांना सांगितले मात्र आरोपी हे महिला तंत्रज्ञांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर सहाय्यक अभियंता शेख याच्या मदतीने महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . नवघर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे.


शेअर करा