जगभरात आत्तापर्यंत तब्बल आठ कोटी लोकांना एचआयव्ही लागण झाल्याची माहिती राजस्थान एड्स कंट्रोल सोसायटीकडून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत एचआयव्हीने तब्बल चार कोटी लोकांचा मृत्यू झालेला असल्याचे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे .
जागतिक एड्स दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी जयपूर इथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळी बोलताना डॉक्टर दिनेश माथूर यांनी माहिती दिली की , ‘ जगातील सुमारे आठ कोटी लोकांना याचाही अर्थात एड्सची लागण झालेली असून त्यापैकी चार कोटी पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर एचआयव्ही रोखण्यासाठी भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे , ‘ असे देखील ते म्हणाले.
इतर मान्यवरांनी देखील त्यावेळी आपली भूमिका मांडलेली असून एचआयव्ही ग्रस्त लोकांसाठी पाठिंबा दर्शवणे , एड्स संबंधित रोगाचे प्रतिबंध हे जागतिक एड्स दिनाचे मुख्य मुद्दे आहेत. जागतिक स्तरावर 12 लाख गर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण झालेली असून बाधित महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे .