चारपैकी तीन राज्यात भाजप विक्रमी विजयाच्या दिशेने , तेलंगणात काँग्रेस आघाडीवर

शेअर करा

देशातील पाचपैकी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल समोर येण्यास सुरुवात झालेली असून मध्य प्रदेश , राजस्थान आणि छत्तीसगड येथे भाजप सत्तेवर येताना दिसत आहे तर दुसरीकडे बीआरएस पक्षाला तेलंगानामध्ये काँग्रेसने कडवे आव्हान देत स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

भाजप मध्यप्रदेशातील सत्ता कायम ठेवत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये भाजप सत्तेत येत असल्याचे दिसून येत आहे म्हणजेच राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होण्याचा क्रम यावेळी देखील कायम आहे . तेलंगणात काँग्रेस बहुमताकडे जोराने वाटचाल करत आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्टेंकी टक्कर सुरु भाजपचे पारडे वरचढ असल्याचे दिसून येत आहे .

राजस्थानमध्ये विधासभेच्या 200 जागा आहेत. त्यापैकी 199 जागांवर मतदान झाले आहे. या ठिकाणी यंदाही पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा दिसत आहे आहे.१९९ पैकी १०६ जागांवर भाजपने आघाडी घेत काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेस ८१ जागांवर आघाडीवर आहे तर मध्य प्रदेश विधाससभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मध्य प्रदेशात यंदा विक्रमी 76.22 टक्के मतदान झाले. हे विक्रमी मतदान भाजपच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. भाजपने १४० जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ८५ जागांवर आघाडीवर आहे.

छत्तीसगड विधानसभेसाठी 90 जागांवर मतदान झाले. छत्तीसगडमध्ये 2018 नंतर 15 वर्षांनी काँग्रेस सत्तेत आली परंतु आता काँग्रेसला सत्ता राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस दिसत आहे. काँग्रेसने ४५ जागांवर आघाडी घेतली असून भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे. दोन ठिकाणी इतरांना यश मिळाले आहे.


शेअर करा