नगर शहरात लाचखोरीचा अद्भुत प्रकार समोर आलेला असून सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागातील कनिष्ठ सहाय्यक असलेला असलेला लिपिक संतोष बाळासाहेब जाधव याला २२५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केलेली आहे . कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तक्रारदार व्यक्ती 2021 पासून जांभळी गावच्या सरपंच असून गावच्या सभा मंडपासाठी आमदार निधीतून 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि यासाठी प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली . वर्क ऑर्डरसाठी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाकडे मागणी करण्यात आली मात्र वर्क ऑर्डर देण्यात आली नाही. लिपिक असलेला संतोष बाळासाहेब जाधव याने त्यासाठी रकमेच्या दीड टक्के म्हणजे 23 हजार रुपयांची लाच मागितली होती त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तक्रारदार व्यक्ती यांनी संपर्क साधला.
पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला आणि 23 हजारापैकी तडजोड करून 22 हजार पाचशे रुपये लाच घेताना संतोष बाळासाहेब जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले . पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे , बाबासाहेब कराड , सचिन सुद्रिक यांनी देखील कारवाईत भाग घेतलेला होता.