‘ शिकारी खुद्द यहाँ .. ‘ , लाचखोर ईडी अधिकारी पाठलाग करून धरला

शेअर करा

देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन छापे टाकण्याची कारवाई करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यालाच एका डॉक्टरकडून वीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे . मदुराई येथील ही घटना असून डीव्हीएसीच्या अधिकाऱ्यांनी चक्क आठ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून या अधिकाऱ्याला पकडलेले आहे. तामिळनाडूच्या डीनडीगूल येथील हा प्रकार आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अंकित तिवारी असे या अधिकाऱ्याचे नाव असून एका डॉक्टरकडे त्याने वीस लाख रुपयांची लाच मागितली होती. 15 डिसेंबर पर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली असून 2016 च्या बॅचचा तो अधिकारी होता . यापूर्वी त्याने गुजरात आणि मध्य प्रदेशात देखील काम केलेले होते . काही महिन्यांपूर्वी तो मदुराई येथे जॉईन झाला . आत्तापर्यंत त्याने सुमारे पाच वर्ष ईडीसोबत काम केलेले असून अंकित तिवारी याने चार मोठ्या अकाउंटिंग फर्ममध्ये देखील इडीमध्ये जॉईन होण्याच्या आधी काम केलेले असल्याची माहिती आहे .

डीवीएसीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या वृत्तानुसार अधिकाऱ्याला रोखण्यात आलं त्यावेळी तो महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन असलेल्या एका गाडीमधून कारमधून वीस लाख रुपये घेऊन जात होता . नागपूरच्या दिशेने जात असताना त्याला पकडण्यात आले तेव्हा त्याच्याजवळ वीस लाख रुपयांची रोकड आढळून आली असे सांगण्यात आलेले आहे .


शेअर करा